• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खान्देश मिल्सच्या माजी कामगार व वारसांना देणी मिळणार

कायदेशीर देणी मिळवण्याकरिता दावा दाखल करण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
खान्देश मिल्सच्या माजी कामगार व वारसांना देणी मिळणार

जळगाव, (जिमाका) : जळगावातील खान्देश स्पिनिंग अ‍ॅन्ड विव्हिंग मिल्स कंपनी लिमिडेट ही कापड गिरणी सन १९८४ मध्ये बंद पडली होती. उच्च न्यायालयाकडून या गिरणीच्या अनुषंगाने नेमलेल्या अवसायकने (Official Liquidator) एकूण २,५९६ कामगारांच्या रक्कमा निश्चित केलेल्या आहेत. दिलेल्या आदेशानुसार, मे. खान्देश स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स लिमिटेडच्या आस्थापनेचे कामगार हे पूर्ण ९% व्याजदराने कायदेशीर देणी मिळण्यास पात्र आहेत.

या कामगारांना क्लेम वितरणासाठी सर्वोच्च न्यायालाने सुरुवातीस सहा महिन्यांची मुदत दिलेली होती. तथापि सदर कामगारांनी वेळेत दावे दाखल केलेले नसल्याने त्यानंतरही वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने दावा दाखल करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. मात्र अद्यापही एकूण ४७६ कामगारांनी किंवा त्यांच्यापैकी मयत झालेल्या कामगारांच्या कायदेशीर वारसांनी, राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांच्याकडे त्यांच्या कायदेशीर देणींचा दावा दाखल केलेला नाही.

कामगारांपैकी जर कोणत्याही माजी कामगाराचे निधन झाले असेल, तर मृत कामगाराचे कायदेशीर वारसदार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळप्रतींसह सहायक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कडे किमान एक महिन्याच्या आत सदर कायदेशीर रक्कमा मिळण्यासाठी दावा (Claim) दाखल करू शकतात.

तरी या कापड गिरणीत काम करीत असणाऱ्या तमाम कामगार व मयत कामगारांच्या वारसदार असे एकूण ४७६ माजी कामगारांनी सदर कायदेशीर देणींचा दावा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पहिला मजला, पंचमुखी हनुमान मंदिर- स्वातंत्र्य चौक रोड, जळगाव येथील सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात पुरावे दाखल करावे असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
डॉ.केतकी पाटील निर्मित संविधान @७५ दिनदर्शिकेचे ना रक्षा खडसेंकडून कौतुक

डॉ.केतकी पाटील निर्मित संविधान @७५ दिनदर्शिकेचे ना रक्षा खडसेंकडून कौतुक

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add