• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया’ विशेष शिबिराचे शुक्रवारी आयोजन

मुंबईच्या द स्पाईन फाउंडेशनमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागाचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 22, 2025
in आरोग्य
0
‘मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया’ विशेष शिबिराचे शुक्रवारी आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये जानेवारी महिन्यातील दर शुक्रवारी ‘मणक्याचे आजार : निदान व उपचार’ याविषयी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मणक्याचे आजार या संदर्भामध्ये मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशनच्या टीमकडून जळगावच्या शासकीय रुग्णालयात सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या रुग्णांना कमरेचे दुखणे, सायटिका, स्पॉंडीलाइटिस, स्लिप डिस्क, कमरेच्या वेदना, पायाला सारख्या मुंग्या येणे, पायाची ताकद कमी असणे असे मणक्याचे विविध आजार असतील तर त्यांनी तपासणीसाठी जानेवारी महिन्यात दर शुक्रवारी शासकीय रुग्णालयात सकाळी ९.३० ते १ या वेळेमध्ये कक्ष क्रमांक ११५ या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे.

तपासणी दरम्यान गरजू रुग्णास जर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर शस्त्रक्रिया देखील करून मिळणार आहे. त्यासाठी याच महिन्यात मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशनचे नामांकित व सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स यांची टीम रुग्णालयात येणार आहे. रुग्णांनी मणक्याच्या दुखण्यासंदर्भात आयोजित तपासणी शिबिराला उपस्थिती द्यावी, असे आवाहन अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

Next Post
खान्देश मिल्सच्या माजी कामगार व वारसांना देणी मिळणार

खान्देश मिल्सच्या माजी कामगार व वारसांना देणी मिळणार

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add