• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in कृषी
0
अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव, (जिमाका) : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे शेतक-यांना देणे सुलभ व्हावे, याकरीता केंद्र शासनामार्फत अ‍ॅग्रीस्टॅक (Agristack) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

भुसावळ तालुक्यात अ‍ॅग्रीस्टॅक या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व सेवा केंद्र चालक यांची भुसावळ तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालय येथे बैठक घेऊन प्रशिक्षण वर्ग अयोजीत करण्यात आले होता.

या योजनेअंतर्गत शेतकरी खातेदार यांना फार्मर आयडी प्राप्त होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होणार आहे त्यांना शासनाकडुन विवीध योजनेचा लाभ जलदगतीने मिळणार आहे. जसे पि.एम. किसान सन्मान योजना, पिक विमा योजना, पिक कर्ज, नुकसान भरपाई अनुदान DBT दवारे वाटप, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती पिकाबदददल सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचा यात सामावेश आहे.

सर्व शेतकरी यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावी असे आवाहन भुसावळचे तहसिलदार यांच्याकडुन करण्यात आले आहे. भुसावळ तालुक्यात एकुण २५४०० खातेदार यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. फार्मर आयडी करण्याकरिता गावातील तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, CSC चालक यांच्याकडून शेतकरी यांची नोंदणी करुन घ्यावी. या योजनेत नोंदणी करण्याकरीता केवळ आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक शेतकरी आवश्यक आहे. आज दिनांक २१ जानेवारी पासुन कॅम्पमोड वर सर्व गावात विशेष शिबीरे आयोजीत करण्यात आलेली असुन सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तहसिलदार यांनी केले आहे.

Next Post
ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले ; पाचोरा येथील प्रकार

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ठेकेदाराला ७९ लाखांमध्ये गंडविले ; पाचोरा येथील प्रकार

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add