• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मित्रानेच केला मित्राचा संसार उध्वस्त ; पाटचारीत उडी घेऊन एकाने संपविली जीवनयात्रा

एरंडोल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in गुन्हे
0
मित्रानेच केला मित्राचा संसार उध्वस्त ; पाटचारीत उडी घेऊन एकाने संपविली जीवनयात्रा

जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील रवंजा येथील एका तरुणाने गिरणा पाटचारीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याघटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

सुनील हिरालाल जगताप (वय ३३, रा. रवंजा ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला अनिल हिरालाल मराठे (रा. रवंजा) यांनी खबर दिली आहे. त्यानुसार सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता एका कंपनीत अनिल मराठे हे कामाला गेले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राने, तुझा लहान भाऊ सुनील जगताप यांनी गिरणा पाटचारी मध्ये उडी घेतली आहे. तू घरी ये, असा फोन केला.

सकाळी ७ वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची शेत शिवारातील अनिल नारायण महाजन यांच्या शेताजवळील गिरणा कॅनॉलमध्ये सुनील जगताप हा आढळून आला. त्याला खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी सुनील जगताप यांना मयत घोषित केले आहे. (केपी)यानंतर कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान सुनील जगताप यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे.

त्याच्यामध्ये म्हटले आहे की, मी सुनील आजपासून सर्व त्याग करीत आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे. आम्ही दोघेजण व्यवस्थित जीवन जगत होतो. पण आमच्या दोघांमध्ये डिगंबर थोरात याने माझ्या बायकोवर नजर ठेवत होता आणि तिला धमकी देत होता. तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे केले नाही तर मी तुला बदनाम करेल. हे तिने मला सर्व काही सांगितले व मी ते ऐकून स्तब्ध झालो. माझे होश उडाले. आता मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवतो असे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. घटनेमुळे रवंजा गावामध्ये शोककळा पसरली असून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि. निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add