जळगाव, (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या कार्याध्यक्षपदी आनंद ढिवरे व प्रधान सचिवपदी हेमंत सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. हि कार्यकारिणी २०२५ या एक वर्षाची आहे.
नुकत्याच झालेल्या साप्ताहिक बैठकीत हि निवड करण्यात आली. बैठकीला निरीक्षक म्हणून जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील महिलेला काळे फासून धिंड काढणे आणि सातारा जिल्ह्यात महिलेचा नरबळी दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून अशा घटनांचा महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेच्या बैठकीत निषेध करण्यात आला.तसेच आगामी उपक्रमाविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच, सभासद नोंदणीबाबत आढावा घेण्यात आला. समितीच्या विधायक कार्याला पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे असे सांगून निरीक्षक विश्वजीत चौधरी यांनी आळंदी येथे झालेल्या समितीच्या ३५ वर्षपूर्ती अधिवेशनाची माहिती दिली. यानंतर एकमताने २०२५ या वर्षाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी उद्योजक यशवंत खंडू बारी यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. शुभम झाल्टे यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष व प्रधान सचिव या महत्वाच्या कार्यकारी पदांवर अनुक्रमे आनंद ढिवरे व हेमंत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
▪️जळगाव शहर शाखेची कार्यकारिणी- २०२५
अध्यक्ष : यशवंत खंडू बारी
उपाध्यक्ष : ॲड. शुभम राजेश झाल्टे
कार्याध्यक्ष : आनंद ढिवरे
प्रधान सचिव : हेमंत प्रह्लाद सोनवणे
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह : प्रा. डॉ. कल्पना दिलीप भारंबे
महिला सहभाग कार्यवाह : कल्पना शिरीष चौधरी
विविध उपक्रम विभाग कार्यवाह : गुरुप्रसाद पाटील
युवा विभाग कार्यवाह : जितेंद्र धनगर
बुवाबाजी विभाग कार्यवाह : प्रा. डॉ. दिलीप शंकर भारंबे