अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसाळे गावात सामुहिक भिंतीवर टिव्हीचा सेटअपबॉक्स लावण्याच्या कारणावरून कुटुंबातील तीन जणांना शिवीगाळ करत दारूच्या नशेत लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरसाळे गावात आबा कौतीक महाले (वय ४५) हे बुधवारी दि. १५ जानेवारी रोजी त्यांच्या घराच्या सामुहिक भिंतीवर टिव्हीचा सेटअपबॉक्स लावत होते. त्यावेळी आवाज आला. या कारणावरून शेजारी राहणारे सुभाष एकनाथ महाले, रितेश सुभाष महाले आणि मंगला सुभाष महाले या तिघांनी आबा कौतीक महाले यांच्यासह त्यांची आई व मुलगा यांना लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आबा महाले यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून मारहाण करणारे सुभाष एकनाथ महाले, रितेश सुभाष महाले आणि मंगला सुभाष महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद माळी हे करीत आहे.