• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भोई वाड्यात लोखंडी झाऱ्याचा प्रहार ; तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 17, 2025
in गुन्हे
0
भोई वाड्यात लोखंडी झाऱ्याचा प्रहार ; तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण

जळगाव, (प्रतिनिधी) : किरकोळ वादातून शहरातील हरिविठ्ठल नगर येथील एका तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास भोई वाड्यात घडलेल्या या घटनेत लोखंडी झाऱ्याचा प्रहार करून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हरिविठ्ठल नगरातील भोई गल्लीत कांतीलाल श्रीराम सपकाळे (वय ३५) हा तरुण राहतो. त्याच्या घरासमोर महेंद्र पंडीत भोई राहतो. बुधवारी सकाळी कांतीलाल यांच्या आई घरासमोर नाली साफ करत होत्या. त्यावेळी महेंद्र भोई यांनी विनाकारण शिवीगाळ केली. कांतीलाल यांनी आईला शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्यावर महेंद्र भोई संतापला. त्याने घरातून लोखंडी झारा आणून कांतीलाल यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात कांतीलाल गंभीर जखमी झाले. याच वादात भरत सपकाळे यांना क्रिश भोई याने लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच विक्रम सपकाळे व त्यांच्या आईंना मनिषा भोई हिने शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली.

कांतीलाल सपकाळे यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. जखमी स्थितीत ते रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले असता पोलिसांनी त्यांना तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी मेडीकल मेमो दिला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर कांतीलाल सपकाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे महेंद्र पंडीत भोई, पियूष महेंद्र भोई, मनिषा महेंद्र भोई, आणि क्रिश महेंद्र भोई या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime
Next Post
प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add