जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील दुकान व कार्यालय फोडून चोऱ्या करणाऱ्या संशयित आरोपीला एलसीबीच्या टीमने अटक केली आहे. त्याच्याकडून १८ हजार ९८० रुपये जप्त करण्यात आले आहे.
जळगाव येथील चित्रा चौक भागातील ‘जिल्हा कृषी आद्योगिक सर्वेसर्वो सहकारी संस्था मर्यादित’ कापड दुकानाचे दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने दि. ०२ जानेवारी रोजी पहाटे ड्रॉवरमधून ८ हजार रुपये चोरून नेले होते. या घटनेबाबत कमलाकर अभिमन ठाकरे (रा. घनश्याम नगर जळगाव) यांनी फिर्याद दिली होती.
यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यासह दि. ०६ जानेवारी रोजी पोलनपेठ जळगाव येथील नरेश डुंगरशी सोनी यांचे पापूलर ट्रेडर्स तेल दुकान, योगेश रामप्रसाद अग्रवाल यांचे योगेश प्रोव्हीजन किराणा दुकान आणि मिलीद अंबादास अटवाल यांचे तिरूपती हेअर आर्ट दुकान यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने एकूण ३ हजर ६०० रुपये चोरून नेले होते. यावर देखील जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
हे दोन्ही गुन्हे जळगाव शहरातील मुख्य बाजार परिसरात घडल्याने, याचे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते. तपासाच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेश मेढे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, विजय पाटील आणि हरीलाल पाटील यांच्या टीमने तपास सुरु केला.
तपासादरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रविण वसंत सपकाळे (वय ४४, रा. भोलाणे, ता. जळगाव) याचा शोध घेतला. त्याला अंजिठा चौफुली जळगाव येथून ताब्यात घेतल्यावर त्याने या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात त्याच्याकडून एकूण १८९८०/- रुपये जप्त करण्यात आले. आरोपीस जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.