जळगाव, (प्रतिनिधी) : येथील खुबचंद सागरमल माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सर्व विदयार्थाची आरोग्य तपासणी डॉ. लोकेश चौधरी, डॉ. शितल गायकवाड, अशरा पटेल, दिपा भावे यांनी केली. त्याचबरोबर लक्षणानुसार विद्यार्थ्यांना लगेच औषधी देण्यात आली. या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापीका योगीनी बेंडाळे, योगेद्र पवार, लक्ष्मीकांत महाजन, प्रवीण पाटील, विजय पवार, संतोष चौधरी आदी शिक्षक वृंदावणे कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.