• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामावरून परतताना झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू !

यावल तालुक्यात किनगाव येथे शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव येथे राहत असलेल्या तरुणाचा दि.१ जानेवारी रोजी नाशिक शहरातील सातपूरजवळ कामावरून घरी परत येत असतांना कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत अपघात होऊन तरुण गंभीर जखमी झाला होता. दोन तीन दिवसांपासून त्याच्यावर नाशिक येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी त्याची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अविनाश अशोक पवार (वय २२, रा. किनगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील वारल्यानंतर त्याच्यासह मोठ्या भावावर घराची जबाबदारी होती. त्याच्या पश्चात आई, एक अविवाहित मोठा भाऊ, असा परीवार आहे. अविनाश पवार हा तरुण आपल्या मित्रांसोबत गेल्या एक महिन्यापूर्वीच नाशिक येथे एका खासगी कंपनीत कामानिमित्त गेला होता.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत कामावरुन घरी खोलीवर परत येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली होती. यात मित्र व अविनाश दोन्ही जण जबर जखमी झाले होते. यात अविनाश पवार याची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे किनगाव येथे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

 


 

Next Post
मुंबईच्या एकलनाट्य महोत्सवात ‘नली’ ची निवड

मुंबईच्या एकलनाट्य महोत्सवात 'नली' ची निवड

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add