• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे, ती आत्मसात करा.. – मंत्री गुलाबराव पाटील

६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगावात उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2025
in क्रिडा
0
खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे, ती आत्मसात करा.. – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ जळगावात करण्यात आला. या स्पर्धेत २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, ज्यामुळे या स्पर्धेने राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून ओळख मिळवली आहे.

उद्घाटनप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, “सॉफ़्टबॉलसारख्या स्पर्धा शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि मानसिक समतोल वाढवण्यास मदत करतात. खेळ विद्यार्थ्यांना सामूहिकतेची भावना आणि अनुशासनाचे महत्त्व पटवून देतात.” “खेल भावना विद्यार्थ्यांसाठी जीवनाची पाठशाळा आहे. ती विद्यार्थ्यांना मेहनत, एकता, सहयोग आणि परस्पर आदर शिकवते, जे जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ६८ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत व खेळाडूंना शुभेच्छा देत, “आपल्या क्रीडाशक्तीला प्रकट करा आणि सकारात्मक बदल घडवा,” मैत्रीपूर्ण स्पर्धेची भावना कायम ठेवा आणि आपल्या मेहनतीद्वारे समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या.”या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल जळगाव शहराचे कौतुक करत त्यांनी सांगितले, या स्पर्धेमुळे जळगावला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळत आहे. क्रीडा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकीचा बोध देते.”

उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. राजूमामा भोळे, पंजाबचे आ. विनरजित सिंग, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त नारायण खडके, शाम कोगटा, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, माजी नगरसेविका उज्वला बेंडाळे, सॉफ्टबॉल महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पी. ई .तात्या पाटील, स्पर्धा निरीक्षक पदम सिंग कौंतेय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील आकाशात फुगे सोडून राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन झाले असे केले. त्यावेळी खेळाडूंनी आतिषबाजी देखील केली. तसेच मंत्री गुलाबराव पाटील आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडांगणाचे पूजन करून स्वतः सॉफ्टबॉल खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले तर आभार सचिन निकम क्रीडा अधिकारी यांनी मांनले.

Tags: #sports
Next Post
वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष ; स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष ; स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group