जळगाव, (प्रतिनिधी) : येथील घुगे पाटील फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका-२०२५ चे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घुगे पाटील फाऊंडेशन दिनदर्शिका- २०२५ चे अवलोकन करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिनदर्शिकेची उत्कृष्ट सजावट व मांडणी केल्याबद्दल कौतुक केले. आणि फाउंडेशनच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जे.जे. हॉस्पिटलचे माजी डीन नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने, जळगाव महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, अरविंद देशमुख, डॉ. रितेश पाटील, उदय भालेराव, लक्ष्मण चौधरी, मनोज काळे, पितांबर भावसार, विठोबा चौधरी, डॉ. क्षितिज भालेराव, निलेश घुगे पाटील, उमेश खांबेटे, तुषार घुगे पाटील उपस्थित होते.