• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळाव्याचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 31, 2024
in जळगाव जिल्हा
0
इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळाव्याचे आयोजन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व माध्यमिक शिक्षणधिकारी कार्यालय, जि.प. जळगाव व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ व ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या करिअर मेळाव्यात पहिल्या दिवशी तज्ञांमार्फत विद्यार्थी व पालकांना करिअर समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्यात ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी निवडी, क्षमता, व्यक्तीमत्व, याबाबत जाणीव निर्माण करण्यासंदर्भात समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तर दुस-या दिवशी जिल्हयातील नियाक्तांमार्फत व्यवसाय नियुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन व प्रत्यक्ष स्थळी नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या करिअर मेळाव्याचे आयोजन जळगाव येथील अॅड. बबन बाहेती, ज्यू. कॉलेज, रोझलँड इंग्लिश स्कूल शेजारी, ख्वॉजामिया दर्गा चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. या मेळाव्याअंतर्गत उद्योजक त्यांच्या कडील रिक्त पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण होणारे व १८ वर्ष वय पूर्ण होणा-या विद्यार्थ्यांस नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी असून इ.९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी या करिअर मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Tags: #jalgaon #maharashtra#jobeducation
Next Post
अवैध गॅस रिफीलींग वर पोलिसांची मोठी कारवाई

अवैध गॅस रिफीलींग वर पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group