जळगावात तेली समाजातर्फे रविवारी वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) : शारदा एज्युकेशनल फाऊंडेशन आणि श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या स्थळाचे भूमीपूजन खान्देश सेंट्रल मैदान, स्टेशन रोड, जळगाव येथे समाज मान्यवरांचे उपस्थित आज बुधवारी संपन्न झाले. दि. २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या नियोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याला राज्यभरातून हजारो समाजबांधव येणार आहेत.
स्थळाचे विनोद शांताराम चौधरी व प्रतिभाताई विनोद चौधरी यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी विजय चौधरी, संतोष चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, रामचंद्र चौधरी, बबन चौधरी, पांडुरंग महिपत चौधरी, योगराज चौधरी, प्रशांत सुरळकर, विशाल डिगंबर पाटील, दिलीप चौधरी, पांडुरंग महाले, चंद्रकांत चौधरी, सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, हरेश्र्वर चौधरी, भैय्या चौधरी, विपुल चौधरी, संदिप चौधरी, भूषण चौधरी, राहुल चौधरी, मनोज चौधरी, चेतन चौधरी, मंगेश चौधरी, पंकज चौधरी, दिपक चौधरी, मयुरेश चौधरी, टुनेश चौधरी, प्रदिप चौधरी, राहुल दत्तात्रय चौधरी, प्रणव महाले, पराग चौधरी, नरेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, वासुदेव चौधरी, बापू चौधरी, राहुल बबन चौधरी, शरद चौधरी, संजय चौधरी , मयुर चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश साहेबराव चौधरी , मोहित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
समाज बांधवांनी सदरचा राज्यस्तरीय मेळावा यशस्वी करण्याचे शारदा एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर, उपाध्यक्ष बबन चौधरी, सचिव रामचंद्र चौधरी, विशाल डिगंबर पाटील आणि संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था यांनी आवाहन केले आहे.