• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !

राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते उदघाटन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 17, 2024
in जळगाव जिल्हा
0
तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !

जळगाव, (जिमाका) : जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. तर जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत. या कारागृहाची बंदी क्षमता २०० इतकी असून यात प्रत्यक्ष ५२४ बंदी बंदिस्त आहेत. नविन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये ६० बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झालेली आहे. या बॅरेक बांधकामाचे उद्घाटन कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

या जिल्हा कारागृहा करीता जिल्हा नियोजन समिती कडून एकूण १,१०,८०,२१३ रुपये निधी प्राप्त झाला होता. ज्यात पुरुष बंदयाकरीता दोन नवीन बॅरेक ७३,७७,५१४ रुपये व तृतीयपंथी बंद्याकरीता एक बॅरेक ३७,०२,६९९ रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आलेले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मदतीने कारागृहातील बंदयाचे टी.बी., एच आय व्ही, क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी नुसार बंदयावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत.

तसेच कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरीता चार वॉचटॉवर, मुख्यप्रवेशव्दार, स्वयपांकगृह रंगरगोटीची कामे प्रगतीपथावर असल्याने श्री डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कामाची पाहाणी करून कामे तत्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बॅरेक बांधकामाच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

Next Post
मद्यधुंद एसटी बस चालकावर निलंबनाची कारवाई

मद्यधुंद एसटी बस चालकावर निलंबनाची कारवाई

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add