• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वामिनारायण मंदिराच्या गुरुकुल सचिवाची आत्महत्या ; खिशात सापडली चिठ्ठी

भुसावळ तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 16, 2024
in जळगाव जिल्हा
0
स्वामिनारायण मंदिराच्या गुरुकुल सचिवाची आत्महत्या ; खिशात सापडली चिठ्ठी

भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील स्वामीनारायण गुरुकुलचे सचिव स्वामी ऋषीस्वरुपदास (वय २८) यांनी शुक्रवारी मध्य रात्रीनंतर छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजता उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ऋषीस्वरुपदास हे शनिवारी सकाळी गुरुकुलचे प्रमुख के. के. शास्त्री यांच्यासोबत गुजरातमधील वडताल येथे जाणार होते. त्यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत संस्थेच्या आवारात देखरेख केली. यानंतर सकाळी त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह व खिशात चिठ्ठी आढळली. त्यात ‘वाय फाय कनेक्ट, मोबाइल चेक करा’ असा मजकूर लिहिला आहे. भुसावळातून जळगावला जाताना शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर श्री स्वामी नारायण गुरुकुल संस्था आहे. २८ वर्षीय स्वामी ऋषीस्वरुपदास हे तेथे गेल्या १० वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत आहेत.

ऋषीस्वरुपदास हे शनिवारी दि.१४ रोजी सकाळी गुरुकुलचे प्रमुख आणि जळगाव येथील स्वामीनारायण मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आलेले स्वामी के.के.शास्त्री यांच्यासोबत वडताल येथे जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत गुरुकुलच्या आवारात सर्वत्र पाहणी केली. दरम्यान, शनिवारी सकाळी पूर्वनियोजनानुसार के. के. शास्त्री व इतर सहकारी गुजरातमध्ये जाण्यासाठी वाहन घेऊन तयार झाले होते. सर्व जण शास्त्री ऋषीस्वरुपदास यांची वाट पाहत होते. पण, बराच वेळ होऊनही ते आले नाहीत. त्यामुळे त्यांना आवाज देण्यात आला. पण, दोन-तीनवेळा आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही.

यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यात आला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने खोलीची खिडकी उघडली. त्यावेळी ऋषीस्वरुपदास यांनी गळफास घेतल्याचे दिसले. ही माहिती भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली.

पंचनामा दरम्यान पोलिसांनी चिठ्ठी, मोबाइल, गळफासासाठी वापरलेली दोरी असे साहित्य जप्त केले. स्वामी ऋषीस्वरुपदास यांनी शुक्रवारी रात्री शेवटची चर्चा गुरूकुलचे प्रमुख के.के. शास्त्री यांच्याशी झाली होती. सकाळी ६ वाजता वडताल येथे येण्याबाबत सांगितले. संस्थेच्या आवारात गस्त केल्यानंतर ते रात्री २ वाजेनंतर झोपी गेले. पण, सकाळीच धक्कादायक घटना उघडकीस आली.

स्वामी ऋषीस्वरुपदास हे मूळ भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील उमेश कडू भारंबे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ऋषीस्वरुप हे अडीच वर्षांचे होते तेव्हापासून त्यांना गुरूकुलमध्ये सेवेसाठी दिले होते. त्यांचे शिक्षण गुरुकुल व नंतर गुजरातमध्ये झाले.

Next Post
तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !

तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !

ताज्या बातम्या

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन
जळगाव जिल्हा

‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

February 25, 2026
जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू
गुन्हे

जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

February 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group