जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्यामध्ये एक ते दोन वर्षांपासून बेवारस वाहने पडून आहेत. संबंधितांनी ती वाहने न नेल्यास त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. वेगवेगळ्या भागामध्ये बेवारस वाहने आढळून आल्यानंतर ती जप्त करण्यात आली होती.
शनिपेठ पोलिस ठाण्यात एक ते दोन वर्षांपासून १४ दुचाकी पडून आहेत. या वाहनांची खात्री करून व त्याचे आवश्यक दस्तावेज सादर करून ते घेऊन जाण्याविषयी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी कळविले आहे. ही वाहने न नेल्यास त्यांचे मूल्यांकन करून त्यांचा लिलाव करण्यात येईल व रक्कम शासन जमा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.