• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ३, ४, ५ जानेवारीला आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 30, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
बालगंधर्व संगीत महोत्सवाचे ३, ४, ५ जानेवारीला आयोजन

पहा कोणकोणते कलावंत कला सादरीकरण करणार

जळगाव, (प्रतिनिधी) : स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने जळगावात ‘बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट, दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.

या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात दि.३ जानेवारी रोजी होणार असून उदघाटन समारंभानंतर प्रथम सत्रात बेंगलोर येथील रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना संवादिनीवर अभिनव रवदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील.

द्वितीय सत्र जुगलबंदीने सादर होणार आहे. यामध्ये कोलकाता येथील भाऊ व बहीण बासरी व गायनाची जुगलबंदी सादर करतील. केवळ १५ वर्षांचा अनिरबन रॉय व त्याची बहिण मैत्रेयी रॉय हे दोन कलावंत सन २०२२ मध्ये एका रीऍलिटी शो मधील आपल्या सादरीकरणाने अनिरबनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांना तबल्याची साथ कोलकात्याची रीषा शिवा करणार आहे.

महोत्सवाचे द्वितीय दिनाचे प्रथम सत्र बेंगलोरचाच गायक अनिरुध्द ऐटल सादर करणार आहे. ते शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना संवादिनीवर अभिनव रवंदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र दिल्ली येथील प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री, व पं बिरजू महाराजांची नात शिंजीनी कुलकर्णी कथक नृत्य सादर करतील. त्यांना तबल्याची साथ योगेश गंगाणी, संवादिनी गायन साथ सामी उल्हाह खान, पढतची साथ अश्विनी सोनी, तसेच सतार ची साथ पंडिता प्राजक्ता गुर्जर करतील

तृतीय दिनाचे प्रथम सत्र ‘तबला क्वीन’ या उपादीने सन्मानित झालेल्या कोलकत्याची तबला वादक रींपा शिव आपल्या एकल तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. रीपा यांना संवादिनीवर नगम्याची साथ अभिषेक रवंदे करतील.

समारोपाच्या सत्रात नंदिनी शंकर (व्हायोलिन) व महेश राघवन (जिओ श्रेड) या वाद्यावर जुगलबंदी सादर करणार आहेत. त्यांना तबल्याची साथ प्रख्यात तबला वादक तनय रेगे करणार आहेत. २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची यावर्षीची सुसंवादिनी अभिनेत्री जुई भागवत असणार आहे. जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन वा बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Next Post
जामनेरच्या तरुणाचा जळगावात अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू !

कारच्या धडकेत ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; भुसावळ तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group