जामनेर | किरण चौधरी, (प्रतिनिधी) : विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत मतदारांनी महायुती कडून कौल दिला आहे. संकटमोचक म्हणून ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांची ओळख आहे. त्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दिलीप खोडपे यांचा पराभव करून विजय मिळविला आहे.
गिरीश महाजन यांना १२८६६७ तर दिलीप खोडपे यांना १०१७८२ इतके मते मिळाली आहे. त्यामुळे २६८८५ मतांची लिड गिरीश महाजन यांना मिळाला आहे. दरम्यान जामनेर शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली कार्यकर्त्यांनी “गिरीश भाऊ जिंदाबाद”, “एकच भाऊ गिरीश भाऊ” अशा घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले होते.
गिरीश महाजन यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजरा, फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे संपूर्ण जामनेर शहरांमध्ये जल्लोशाचे वातावरण पाहायला मिळाले. विजयाच्या आनंदात कार्यकर्ते आणि समर्थकांनी मिरवणुकीचे आयोजन केले. नगरपालिका चौक ते मार्केट कमिटी असो भाजपा कार्यालयापर्यंत डीजे च्या गाड्या तसेच शहरातील १२ जेसीबी वरून पुष्पृष्ठी करण्यात आली. तसेच एक डंपर भरून गुलालाची उधळण करण्यात आली. प्रत्येक चौकात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचे दिसून आले. गिरीश महाजन यांनी मिरवणूकीत सहभागीत होत कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला.
महाजन यांच्या समर्थकांनी हा विजय त्यांचा विकास कामची पोचपावती असल्याचे सांगितले “संकटाच्या वेळी गिरीश भाऊ नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःख ज्या ठिकाणी स्वतः जातीने उपस्थित राहतात. याची ही पोच पावती असल्याचे सांगितले आहे. महाजन यांच्या सातव्यांदा विजयामुळे जामनेरच्या विकासामध्ये आणखी भर पडेल अशी नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
VIDEO