• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विकास कामांच्या जोरावर आ. किशोरआप्पांचा विजय निश्चित

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विकास कामांच्या जोरावर आ. किशोरआप्पांचा विजय निश्चित

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकासा कामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असुन पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष मधुकर काटे व विधानसभा संयोजक अमोल पाटील यांनी सांगीतले.

पाचोरा-भडगाव तालुक्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जवळपास तीन हजार कोटीचे विकास कामे केली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी कोट्यावधीची विकास कामे केली आहेत. तर पाचोरा व भडगाव शहराचे रूपच बदलविण्याचे काम त्यांनी केले आहे. महायुतीच्या अडीच वर्षाच्या शासनाच्या काळात त्यांनी मोठ्याप्रणात नीधी खेचून आणला असल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

पाचोरा तालुक्यात ‘विकास’ बोलतोय !..
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा शहरासह तालुक्यात मोठ्याप्रणात विकास कामे केली आहेत. शहरात व्यापारी संकुल, हिवरा नदिवरील पुल, भूमिगत गटार योजना, ओपनस्पेस चा विकास, तारखेडा, माहेजी येथे झालेले ३३/११ केव्ही सबस्टेशन, पहूर ते पाचोरा रस्त्यासाठी मंजुर केलेला निधी, पाचोरा शहरात प्राचीन प्रभु रामचंद्र मंदिर परिसरासाठी आणलेला निधी, याशिवाय काकणबर्डी, पिंपळगाव हरेश्वर, सुकळेश्वर मंदिर, बहूळा प्रकल्पासाठी पर्यटन विकासासाठी मोठ्ठ्या प्रमाणात निधी आणला आहे. नगरदेवळा गटात गडद, तितुर नद्यांवर बांधलेले बंधाऱ्यामुळे शेतकर्याना मोठा लाभ झाला आहे. किशोर आप्पा म्हणजे असे सुत्र झाले आहे. त्यामुळे जनतेचे त्यांच्यावर भरभरून प्रेम आहे असे मत भाजपचे उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी व्यक्त केले.

भडगावचा विकासाचा अनुशेष भरला..
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव शहराचे रूप पुर्णत: बदलविण्याचे काम केले आहे. भडगाव शहरासाठी १३३ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुर करून शहराचा पुढील २५-३० वर्षाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात गिरणा नदिवर पक्का बंधारा बांधण्यात येणार असल्याने ते मोठे होणार आहे. शिवाय जलशुद्धीकरण प्रकल्पाचा ही यात समावेश आहे. याशिवाय गिरणा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ केंद्राचा झालेला विकास, तळणी परीसराचा होत असलेला विकास, भूमिगत गटारीसाठी मंजुर करण्यात आलेला नीधी, ओपनस्पेस चा झालेला विकास, मुख्य रस्ताचे झालेले काॅक्रीटीकरणाचे काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

भाजप पुर्ण ताकदीनिशी किशोरआप्पाच्या पाठीशी..
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे पुर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी आहे. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते हे जोमाने आप्पांचा प्रचार करत आहे. भाजपचे विधानसभा निरीक्षक तथा अहमदाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेत महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचा प्रचार करण्याची सुचना केली असुन त्यांना मोठा मताधिक्याने विजय करण्याचा संकल्प केल्याचे मधुकर काटे व अमोल नाना पाटील यांनी सांगीतले.


Next Post
अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

अभिनेता गोविंदाच्या रोडशोला पाचोर्‍यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!
खान्देश

हद्दपार गुन्हेगार, साथीदार गावठी कट्टा व कोयत्यासह जेरबंद!

October 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group