• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 16, 2021
in आरोग्य
0
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव, (जिमाका) दि. 16 – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते आज बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णवाहिका चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची मागणी मान्य करून त्यांना दिलासा दिला.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ तर आज 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि रूग्णवाहिका चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले.

या रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे – पाटील, आतिष सोनवणे, यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

रूग्णवाहिका चालकांना पालकमंत्र्यांचा दिलासा या लोकार्पण कार्यक्रमात रूग्णवाहिका चालकांनी आपली समस्या पालकमंत्री श्री. पाटील यांचेकडे मांडली. ज्यात आजवर रूग्णवाहिका चालकांना वेतन हे प्रति किलोमीटरच्या दराने प्रदान करण्यात येत होते. मात्र त्यांना फेरीनुसार वेतन मिळावे अशी मागणी चालकांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती जाणून घेतली व त्यांची समस्या सोडविली.


 

Next Post
epaper

खान्देश प्रभात : १५ ऑक्टोबर २०२१

ताज्या बातम्या

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवा’त फॅशन शोच्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिकतेचे दर्शन

January 25, 2026
तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल
खान्देश

तेली समाज महिलांचा स्नेहमेळावा: हळदी-कुंकू आणि खेळांची रंगली मैफल

January 24, 2026
माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या
गुन्हे

माय-लेकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले; संशयिताला बेड्या

January 24, 2026
खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ
खान्देश

खान्देशी संस्कृतीचा जागर; जळगावात ‘बहिणाबाई महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ

January 23, 2026
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण
जळगाव जिल्हा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हॉकर्स बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण

January 23, 2026
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड
खान्देश

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

January 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group