• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ.राजूमामा भोळेंवर फुलांच्या वर्षावात ; मेहरुण परिसरात नागरिकांकडून स्वागत

पंचशील नगर, गवळीवाडा, कुंभारवाडा, अक्सा नगर परिसरात रॅलीत मोठा उत्साह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ.राजूमामा भोळेंवर फुलांच्या वर्षावात ; मेहरुण परिसरात नागरिकांकडून स्वागत

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी मेहरुण परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी प्रचार रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या प्रेमळ नेत्यांवर फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

आमदार राजूमामा भोळे यांनी इच्छादेवी चौकात इच्छादेवी मंदिर येथे पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेऊन आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचशील नगर, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा परिसर, गुलाब बाबा कॉलनी, भीलवाडा, कुंभारवाडा, जय जवान चौक, अक्सा नगर, दत्तनगर मार्गे रामनगर परिसरात रॅलीचा समारोप झाला. तांबापुरा भागातील हजरत बिलाल चौकामध्ये ट्रस्टच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार राजूमामा भोळे यांना पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला.

तसेच मेहरुण मधील ग्रामदैवते श्री विठ्ठल मंदिर, भवानी माता मंदिर यासह महादेव मंदिर या ठिकाणी पूजा अर्चा करून विजयासाठी साकडे घातले. परिसरातील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये महिला भगिनींनी आ. राजूमामा भोळे यांना औक्षण करण्यासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी, “आता २३ तारखेनंतर मंत्री होऊनच मेहरुणमध्ये या” असा आशीर्वाद महिला भगिनींनी आमदार राजूमामा भोळे यांना दिला. मुंडे चौकातील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात नागरिकांनी शाल, श्रीफळ देऊन आ. भोळे यांचा सत्कार केला.

रॅलीमध्ये माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, कैलास सोनवणे, अनिल देशमुख, मधुकरराव ढेकळे, गौरव ढेकळे, गजानन वंजारी, किशोर वाघ, मुकेश किसे, युवराज बोरसे, रामेश्वर मालचे, तुकाराम पाटील, विनोद मराठे, पिंटू ढेकळे, प्रशांत सोनवणे, महादू लाडवंजारी, किरण खडके, विनोद मराठे, पिंटू बेडिस्कर, लता सोनवणे, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, ज्योती चव्हाण, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अर्चना कदम, शोभा भोई, ममता तडवी, जयश्री पाटील, साजिद पठाण, जितेंद्र चांगरे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, नाना भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #political
Next Post
सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार.. -आ. किशोरआप्पा पाटील

सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार.. -आ. किशोरआप्पा पाटील

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add