• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यमान आमदारांची स्वखर्चातून शेतरस्त्यांची कामे केल्याची चमकोगिरी.. – ॲड.रोहिणी खडसे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विद्यमान आमदारांची स्वखर्चातून शेतरस्त्यांची कामे केल्याची चमकोगिरी.. – ॲड.रोहिणी खडसे

सावदा (प्रतिनिधी) : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील विविध गावात स्वखर्चातून शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केले होते. या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु हे मुरुमीकरण स्वखर्चातून न करता शासकीय निधीतून केले गेल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसे या रावेर तालुक्यातील गहुखेडा गावात शेतकऱ्यांसमवेत एका शेतरस्त्याच्या ठिकाणी गेल्या होत्या तिथे बोलताना त्या म्हणाल्या, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गत काळात स्वखर्चातून मतदारसंघातील शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केल्याचा गाजावाजा केला होता. शेतरस्त्यांची कामे केली गेली याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही परंतु हे कामे स्व खर्चातून केले गेलेले नसून, शासकीय निधीतून केले गेलेले आहे. आमदार स्वखर्चातून शेत रस्त्यांची कामे केल्याचा आव आणत केवळ चमकोगिरी करत आहेत.

विशेष म्हणजे शेतरस्त्यांचे मुरुमीकरण हे जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान केले असून या कामासाठी शासकीय निधीचा वापर केलेला आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४ या हेड अंतर्गत मार्च २०२३ मध्ये सदर रस्त्यांचे शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीतून बिले काढली गेलेले आहेत. म्हणजे रस्ते करण्याच्या तीन महिने आधीच त्या रस्त्यांसाठी सरकारी तिजोरीतून शासकीय निधी काढला गेलेला आहे. एका एका रस्त्यांसाठी सात ते दहा लाखांची बिले काढली गेली आहेत. प्रत्यक्षात तीन महिन्यानंतर रस्त्यांचे मुरुमीकरण करताना अंदाजपत्रकानुसार काम न करता एक ते दीड लाखांच्या खर्चात रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण कामे केली गेली असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलायं.

रस्त्यांची कामे करण्याच्या तीन महिने आधीच शासकीय निधीतून बिले काढण्याचा आणि नंतर निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण काम करण्याच्या या कामात शासकीय यंत्रणेला हाताशी धरून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला गेला असून शेतरस्त्यांचे स्वखर्चातून मुरुमीकरण केल्याच्या भूलथापा देऊन शेतकरी बांधव आणि नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या यादीनुसार मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत २०२३-२४ मधून खालील रस्त्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे.

रस्ते करण्याच्या तिन महिने अगोदर शासकीय निधीतून रस्ता कामांची बिले काढण्याचा आणि नंतर थातुरमातुर रस्ते करण्याचा हा प्रकार शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील म्हणाले. यावेळी यु डी. पाटिल, भागवत पाटिल, रामभाऊ पाटील, मधुकर पाटिल, गणेश पाटिल, राजेंद्र चौधरी, सोनु पाटिल, भुषण पाटिल, आकाश पाटील, चेतन पाटील आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.


Tags: #political#rohinikhadsemuktainagar
Next Post
कजगावकरांनी दिला आ. किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास

कजगावकरांनी दिला आ. किशोर पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास

ताज्या बातम्या

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स
क्रिडा

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 28, 2025
‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण

July 28, 2025
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 28, 2025
लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

July 28, 2025
रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group