जळगाव, (प्रतिनिधी) : “ग्रामविकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले.
धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सुजदे, देऊळवाडे येथे गुलाबराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, भाजपचे राजू सोनवणे, अनिल सोनवणे, मन्नूभाऊ सोनवणे उपस्थित होते.
गुलाबराव पाटील यांनी या परिसरात केलेल्या सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर गावकऱ्यांमध्ये अपार विश्वास दिसून येत आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा सह गावं अंतर्गत मूलभूत सुविधांसह शाळा, अंगणवाड्या, आरोग्य सेवा आणि रस्त्यांची सुधारणा अशा विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे.
भवरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जयघोष आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने गुलाबराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच निशिगंधा सपकाळे, अनिल उर्फ गुड्डू सपकाळे, गलू सपकाळे, अमोल सोनवणे, गोकुळ सपकाळे, राजू सोनवणे, गणेश भालेराव, पुंडलिक पाटील, शांताराम पाटील, चंपालाल पाटील, सुरेखा सोनवणे, योगेश सपकाळे, किरण सपकाळे, अनिल मंडोरे, वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील, रविंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, सरपंच सुनील सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.