• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव

मुंबई / जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड’ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव करण्यात आला. काल मुंबई येथे हॉटेल फोर सिझन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अभंग जैन यांनी स्वीकारला.

हुरुन रिपोर्ट हा १९९८ मध्ये लंडनमध्ये स्थापन केलेला एक अग्रगण्य संशोधन, लक्झरी प्रकाशन आणि कार्यक्रम गट आहे. यांचे भारत, चीन, फ्रान्स, UK, USA, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि लक्झेंबर्गमध्ये काम सुरू आहे. अनस जुनैद यांच्या नेतृत्वाखाली २०१२ पासून हुरुन इंडियाचे काम सुरू आहे. भारतातील पारदर्शक संपत्ती निर्मिती, नव कल्पनांची निर्मिती, परोपकाराच्या गोष्टींना प्रोत्साहन, पिढ्यानपिढ्या व्यवसाय सांभाळून त्याचा वारसा पुढे जाणाऱ्या परिवारांना शोधून त्यांचा गौरव करण्याची संकल्पना सुरू केली आहे. या द्वारे बार्कलेज-हुरून इंडिया फॅमिली बिझनेस लिस्ट ही भारतातील प्रमुख कुटुंब-स्वामित्व असलेल्या उद्योग आणि उद्योजकांच्या यादीत समाविष्ट करते. आपल्या व्यवसायाची उत्कृष्टता, नवकल्पना आणि दीर्घकालीन यशासाठीची प्रतिबद्धता या प्रमुख गोष्टींचा विचार करून उद्योजकांची यादी केली जाते.

बार्कलेज-हुरुन पुरस्कार समारंभाने भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या कुटुंबांचा गौरव केला. त्या सर्व कुटुंबीयांचा पिढ्यानपिढ्या व्यवसायात सातत्य राखण्यात आणि त्यांच्या लवचिकतेसाठी यश, अनुकूलनक्षमता, आणि त्यांची मूळ मूल्ये आणि परंपरांवर खरे राहून दीर्घकालीन दृष्टी ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात बजाज ग्रुपचे बजाज कुटुंब, यूपीएल ग्रुपचे श्रॉफ कुटुंब, पिरामल ग्रुपचे पिरामल कुटुंब, पारले प्रोडक्ट्सचे चौहान कुटुंब, मुथुट फायनान्सचे जॉर्ज मुथुट कुंटुंबीय, आयनॉक्सचे जैन कुटुंबिय व आदी इतर कुटुंबांचाही सन्मान करण्यात आला.

 


 

Next Post
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add