जळगाव, (प्रतिनिधी) : रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट प्रायोजित ‘मल्हार संगीत प्रतिष्ठान प्रस्तुत ‘किशोर से कुमार तक या संगीत सोहळ्याचे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिर येथे आज १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुशीलकुमार राणे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले की, सर्व पिढ्यांमध्ये संगीत आणि सांस्कृतिक कलांची आवड निर्माण व्हावी या हेतूने आम्ही मेगा-इव्हेंट, लाइव्ह ऑर्केस्ट्रा सोबत ‘किशोर से कुमार तक’ हा कार्यक्रम घेत असून या उप शास्त्रीय संगीत आणि समकालीन स्वरांच्या मंत्रमुग्ध सोहळ्याला जळगावकरांनी अवश्य उपस्थित राहून संगीताची जादू अनुभवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मल्हार संगीत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. विजय शास्त्री, गौरव मेहता, प्राजक्ता केदार, तृप्ती बाकरे, अमित माळी, नेहा नैनानी व झाकीर खान आदी उपस्थित होते.