जळगाव, दि. 02 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले ह्यांनी दाखविलेल्या रस्त्यावर महात्मा गांधीजींनी केलेले मार्गक्रमण आणि त्या दरम्यान १९३६ मध्ये महात्मा गांधी हे जळगावात आले होते आणि फैजपुर येथील काँग्रेसच्या अधिवशेनात सहभागी झाले, त्यावेळी माझ्या गोदावरी आईने महात्मा गांधी यांना जवळून पाहत, त्यांचे विचार ऐकले आणि ते आमच्या मनावरही बिंबवले असल्याचे डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १ ऑक्टोबर रोजी डॉ.केतकी पाटील हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार डॉ.प्रमोद भिरुड, नर्सिंग प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे, नर्सिंग डायरेक्टर शिवानंद बिरादर, गांधीच्या वेशभुषेत असलेला अंतिम वर्षाचा विद्यार्थी अत्तदीप ताकसांडे हे उपस्थीत होते.
सर्वप्रथम लाल बहादुर शास्त्री आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. दररोज महाविद्यालयाची स्वच्छता ठेवणार्या स्वच्छता कर्मचारी स्टाफमधील १० जणांचा यावेळी डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यावेळी स्वच्छता कर्मचार्यांचे आभार मानण्यात आले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मौसमी लेंढे यांनी प्रास्ताविकात महात्मा गांधी यांच्या कार्याची महती विशद केली तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान नार्याचेही महत्व सांगितले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांनीही महात्मा गांधी यांचे शिक्षण, त्यांचे कार्य याबाबत विवेचन करत आपण आणि आपला परिसर हा स्वच्छ असावा, असा संदेशही दिला. याप्रसंगी उपस्थीतांना आपण स्वच्छता राखूया अशी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेक्चरर ऑलिव्हीया रॉस, आभार वैष्णवी पवार यांनी मानले. याप्रसंगी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, लेक्चरर सुमैय्या शेख, सुमित निर्मल, ऑलिव्हीया रॉस आदिंच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.