जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शिरसोली या पाचोरा महामार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. दि. ३१ ऑगस्ट ला रा. म.मा.क्र.753J की.मी ४.००ते ७.०० ह्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आले. आतापर्यंत २००० हून अधिक विविध जातींच्या झाडाच्या रोपांची लागवड महामार्गाच्या दूतर्फा करण्यात आले. अजून या परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहेत.
डीव्हाइन पार्क ते जैन हिल्स गेट समोरील परिसरात मान्यवराच्या हस्ते वृक्ष पूजन व वृक्षारोपणाचे फलक अनावरण करण्यात आले. शिरसोली ते श्रीकृष्ण लॉन्स पर्यंत महामार्गाच्या दूतर्फा हे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ व तांत्रीक सहाय्य हे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करुन देण्यात आले. करंज, कांचन, निम, चिंच या प्रजातीची रोपे लागवड करण्यात आली आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के., कृषी विभागाचे संजय सोन्नजे, जयंत सरोदे, अजय काळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, संजय ठाकरे, सुरक्षा विभागाचे डी. एन चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर सोन्ने, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, अकाउंट विभागाचे प्रदीप गुजराथी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नितीन सोनजे व सामाजिक वनीकरण व वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिणी थोरात, अजय रायसिंग, हरिष थोरात, प्रकाश बारी व इतर सहकारी उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे यांच्या मार्गदर्शनानुसार वृक्षारोपण यशस्वी करण्यात आले. राजेंद्र राणे यांनी आभार मानले.