• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसे नेणाऱ्या चौघांना अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 27, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

३ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश सीमेवरील उमर्टी येथून तीन गावठी कट्टे आणि १२ जिवंत काडतुस घेऊन जात असताना अहमदनगर येथील चार तरुणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर गावाच्या हद्दीत रविवार दिनांक २५ रोजी ८ वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रासह काडतुस तसेच दुचाकी कार असा सुमारे ३ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अक्षय सुरेश कुलथे (वय २५, वाडी रोड, ता. राहुरी), मनोज भाऊसाहेब नागरे (वय २४, रा. विळद घाट, ता. अहमदनगर), रमेश विठ्ठल आव्हाड (वय २२), आरबाज राज मोहमंद शेख (वय २३. दोन्ही रा. नवनागापुर एमआयडीसी अहमदनगर) असे संशयितांची नावे आहेत. हे तरुण एमएच १६ डीएफ ४३६४ या दुचाकीने तसेच (क्रमांक एमएच १२ डीई ०९१०) या कारने नगर येथून आले होते. उमर्टी येथुन त्यांनी गावठी कट्टे तसेच जिवंत काडतूस विकत घेतले.

त्यानंतर ते परतीचा प्रवास करत असताना लासूर शिवारात चोपडाकडे येणाऱ्या मार्गावर फौजी ढाब्याच्यापुढे चोपडा ग्रामीण पोलिसांनी या तरुणांच्या वाहनाला रोखले. तपासणी करताना त्यांच्याकडे बेकायदेशीरित्या शस्त्रे आढळून आली. यात प्रत्येकी २५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, २० हजार किमतीचा एक गावठी कट्टा, जिवंत काडतुस सहा नग रुपये सहा हजार, ५० हजार रुपये किमतीचा एक अॅपल मोबाईल, ३० हजार किमतीचा, १५ हजार किमतीचा तसेच एक हजार किमतीचा एक असे चार मोबाईल, रोख ४०० रुपये, दीड लाख किमतीची अल्टो कार, ५५ हजार किमतीची एक दुचाकी असा एकुण ३ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सपोनि शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोकों किरण पारधी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चोपडा ग्रामीण पोलीस टीमचे कौतुक केले.


 

Tags: chopdaCrimeJalgaon
Next Post
तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणानदीत गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group