• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बाजारात आईवडिलांना पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 13, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
बाजारात आईवडिलांना पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : आई-वडिलांना बाहेर तुम्ही बाजारात जाऊन या असे सांगून पैसे देऊन पाठविल्यानंतर मुकेश नारायणसिंग ठाकूर (वय ३२, सुप्रिम कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनीत मुकेश ठाकूर हा तरुण राहायला होता. भाजीपाला विक्री करुन तो आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. त्यांची पत्नी दोघं मुलांसह माहेरी गेलेली असताना या तरुणाने आई-वडिलांना बाजारात जाऊन या असे सांगून त्यासाठी पैसेही दिले. त्यामुळे आई-वडील सुभाष चौकात गेले होते. त्यानंतर घरी कोणीही नसताना मुकेश यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आई-वडील घरी आले त्या वेळी त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.

मुलाचा मृतदेह दिसताच मुकेशच्या आई वडीलांनी एकच आक्रोश केला. यावेळी शेजारील मंडळी व भावाने तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले भाऊ असा परिवार आहे.

Tags: CrimeJalgaonsuicide
Next Post
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group