• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 13, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

बांभोरी येथील दुर्दैवी घटना

धरणगाव (वृत्तसंस्था ) ;-सोमवारी जिल्ह्यात ठिकठकाणी कानबाईचे विसर्जन सुरु असतांना विहिरीत डोकावून बघतांना एका २३ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन तो विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे सकाळी उघडकीस आली. मयूर राजेंद्र पाटील वय-२३, रा. बांभोरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बांभोरी येथे कानबाई विसर्जन मिरवणूक सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी वाजत गाजत निघाली होती. या मिरवणुकीत मयूर पाटील सहभागी झाला होता. बांभोरी गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत गावातील लोक हे कानबाई पाण्यात विसर्जन सुरु असतांना मयूर पाटील हा विहिरीच्या काठाजवळ उभा होता. तो विहिरीत डोकावून पाहत असतांना त्यावेळी त्याचा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.

दरम्यान तेथील नागरिकांनी त्याला तातडीने बाहेर काढले व धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

Tags: Crimedharngaon
Next Post
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add