एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- पोलीस ठाण्यात दाखल गुन्हांचा शोध घेत असतांना दुचाकी चोरी चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई करण्यात आली आहे.
सुप्रीम कॉलनी येथील अमजद अजीज खाटीक यांच्या मालकिची होंडा शाईन ही घरासमोरुन दि.१ ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती. याबाबतीत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे सुप्रीम कॉलनी परीसरात दि.९ रोजी गस्त करीत असतांना ४ संशयीतदोन पल्सर मोटार सायकलींवर फिरतांना दिसुन आले होते. त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना दुचाकीबाबत विचारपुस करता एक पल्सर मोटार सायकल ही एरंडोल येथुन आणि दुसरी पल्सर ही रामांनदनगर पोस्टे हद्दीतुन चोरुन आणल्याची त्यांनी कबुली दिली.
आरोपी राहुल आनंदा पाटील (रा.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उमाळा ता. जळगाव), राजेश सुरेश सैंदाणे (रा.पठाण बाबा दर्ग्याजवळ समतानगर, जळगाव), आकाश पंडीत बि-हाडे (उमाळा, ता.जळगाव), प्रथमेश उर्फ बाळु गंगाधर कोलते (रा.उमाळा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सखोल चौकशी करता त्यांनी आणखी दोन दुचाक्याचोरल्याची कबुली दिली.
त्यांना कोठडी सुनावण्यात अली असून त्यांच्याकडून चारही दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हवालदार दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, महेंद्र पाटील, नितीन ठाकुर, सुभाष साबळे, मंदार महाजन, ललीत नारखेडे यांच्या पथकाने केली आहे.