लालसिंग पाटील | भडगाव, दि. 21 – शहरात शिवसेनेने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेचा सोमवारी पहीला टप्प्याचे लसीकरण यशस्वीपणे पार पडले. शिवसेनेने मार्फत कराब जि. प शाळा ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकाच ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लक्ष घालून संपूर्ण भडगाव परिसरात टप्प्याटप्प्याने लसीकरणाची संकल्पना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या समोर मांडली.
दरम्यान आमदार पाटील यांनी मांडलेली संकल्पना यशस्वीपणे पार पडत आहे. संपूर्ण शहरात शिवसेनेतर्फे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत ७००० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत शिवसेना शहर शाखा, युवासेना विद्यार्थी सेना, नगरसेवक नागरिकांचे रजिस्ट्रेशन कोड उपलब्ध करून, व्हेरिफाय करण्यासाठी दोन-तीन दिवस अगोदर पासून टोकन देऊन नागरिकांना लसीकरणासाठी सहकार्य करत आहेत.
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मयुर महाजन, शशी तायडे, संजु भाऊसाहेब, मनोज मोरे, रविंद्र भिल, सतिष गांगुर्डे, गुड्डू वाघ, जि प शिक्षक हेमंत आहीरराव, माधव जगताप, दिलीप राजपूत, गोरख वेळीस, आदित्य पाटील, धनंजय महाजन, निखिल महाजन, अमोल भिल, परेश सोनवणे कधींच शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
लसीकरणासाठी डॉ. प्रशांत पाटील, मेडिकल ऑफिसर डॉ. अभिजीत पाटील, गिरड एन एम पाटे सिस्टर्स , आर एन वाढे आरोग्यसेवक, धनगर वि एन आशास्वयंसेविका संध्या गाडगे यांनी मार्गदर्शन केले. लसीकरण यशस्वीतेसाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नगरसेवक मनोहर चौधरी यांनी सहकार्य केले.