• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्तान ‘आज गांधी आठवतांना…!’ 

ज्ञानपीठ गौरवप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे  ऑनलाईन व्याख्यान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 19, 2021
in जळगाव जिल्हा
0
महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्तान ‘आज गांधी आठवतांना…!’ 

जळगाव, दि. 19 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल या प्रतिज्ञेला २२ सप्टेंबर २०२१ रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ऑनलाईन  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील गोर-गरीब जनतेला नेसायला पुरेसे वस्त्र ही मिळत नाही व आपण मात्र पूर्ण वस्त्रानिशी वावरतो. याबाबीचे गांधीजींना खूप वैशम्य वाटत असे. त्यांचे संवेदनशील मन व्यथित झाले.‘जोपर्यंत गोर-गरीबांना आवश्यक तेवढे वस्त्र मिळत नाही तोपर्यंत फक्त पंचा नेसेल व इतर वस्त्रांचा त्याग करीन…’ ही प्रतिज्ञा त्यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी मदुराई येथे केली. त्या दिवसापासून गांधीजी आजीवन फक्त पंचा नेसून राहिले. महात्मा गांधीजींच्या अनुयायांनी देखील जास्त वस्त्र संग्रह न करता गरजेपुरते वस्त्र वापरण्याचा संकल्प घेतला. गांधीजींच्या या कृतीची प्रेरणा इतरांना देखील मिळाली व इतरांनी देखील कमीतकमी वस्त्र वापरण्यास सुरूवात केली.

महात्मा गांधींच्या या वस्त्र त्यागाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने व ‘त्याग करण्यात नेहमीच स्वात्विक आनंद प्राप्त होतो’ या गांधीजींच्या वचनाचे स्मरण करुन आपल्यातील वाईट सवयी, व्यसन यांचा त्याग करण्याचा संकल्प करण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. २२ सप्टेंबर २०२१ ला दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमात फेसबुक(https://www.facebook.com/gandhiteerth/) व युट्यूब लिंकद्वारे, (https://www.youtube.com/c/GandhiTeerth) सर्वांना सहभागी होता येईल. व्याख्यानानंतर या विषयावर प्रश्नोंत्तरे ही होतील. तरी जास्तीत जास्त संख्येने खालील लिंकवर क्लिक करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा करण्यात आले आहे.

Tags: गांधी रिसर्च फाउंडेशनजळगाव
Next Post
अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न

अखिल भारतीय लेवा पाटिदार युवक महासंघाची विस्तार नियोजन बैठक संपन्न

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group