जळगाव | दि. ०४ ऑगस्ट २०२४ | एका १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील जुने जळगावातील खळवाडी परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय काव्या पावरा (वय- १९, रा. खळवाडी, जुने जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी यांचेसह राहत होता. पत्नी चार ते पाच महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे विजय हा घरी एकटाच होता. विजयने शनिवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री पंख्याला गळफास घेतला.शेजारी राहणारे वडील त्याला बोलविण्यास गेले.
त्या वेळी मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी याविषयी शनिपेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विजयला मयत घोषित केले. प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.