हेमंत पाटील | जळगाव, दि.18 – सुबोनियो केमिकल्स आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात शनिवारी 1500 वृक्षलागवडीचा विक्रमी उपक्रम पार पडला. सुबोध चौधरी परिवाराच्या गाडेगाव शिवारातील २१ एकर खासगी जागेत भव्य वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान आलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
निसर्गाला आपण काहीतरी देणे लागतो या सेवा भावनेतून आयोजकांनी केलेल्या उपक्रमाचे पोलीस अधिक्षक मुंडे यांनी कौतुक करत गौरवोद्गार काढले.
सुबोनिया परिवाराने या प्रकल्पासाठी जमीन व आर्थिक बळ उपलब्ध करून दिले असून मराठी प्रतिष्ठानने वृक्षांच्या लागवडीची व संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.
वृक्ष संवर्धनाच्या अंतर्गत सुमारे १५०० वटवृक्षांची लागवड उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक आॕफ रेकॉर्ड’ मध्ये केली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे महत्त्व आपल्याला कळून चुकले आहे. त्यामुळे ऑक्सीजन पार्कची संकल्पना मागील सहा-सात महिन्यांपासून राबवीत असल्याचे सुबोनियो केमिकल्स अध्यक्ष सुबोध चौधरी यांनी सांगितले.
याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, सुबोनियो केमिकल्सचे अध्यक्ष सुबोद चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सौंदर्या चौधरी सुमोल चौधरी, मराठी प्रतिष्ठानचे जमील देशपांडे, विजयकुमार वाणी, अरुण बऱ्हाटे, अजय कावळे, संजना चौधरी, सुश्मित चौधरी, सुब्रतो चौधरी आदींसह शहरातील वृक्षप्रेमी उपस्थित होते.
पहा.. व्हिडिओ