मनू भाकरआणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला
पॅरिस (वृत्तसंस्था ) ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरआणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. आज दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या १० मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे.
THE HISTORIC MOMENT. 🇮🇳
– MANU BHAKER BECOMES THE FIRST INDIAN TO WIN 2 MEDALS IN 124 YEARS IN ONE OLYMPICS. 🔥 pic.twitter.com/5eS2Uhg4Kc
— Johns. (@CricCrazyJohns) July 30, 2024
याआधी रविवारी (२८ जुलै) मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेतभारताच्या मनू भाकरनेमहिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. २८ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.
जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. २०२२ साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.