• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 28, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

जळगाव | दि. २८ जुलै २०२४ | जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मनीषा भिडे व रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल च्या क्रीडा शिक्षिका मंजुषा देशमुख उपस्थित होते.

अनुभूती निवासी स्कूलने “जळगाव तालुका आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत २०२४-२५” मध्ये चार विजेतेपदे जिंकली. स्पर्धेत, १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त, १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या श्रेणींमध्ये चौथे स्थान अनुभूती स्कूलने पटकावले.

तालुकास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांना मुख्य प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया, सह प्रशिक्षक दीपिका ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत तिवारी यांनी मार्गदर्शन केले. विजयी झालेल्या संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास , व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यशस्वीतेसाठी मुख्य पंच किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जाझीब शेख, पुनम ठाकूर, ईशांत साळी, हमजा खान, अक्षद पगारीया, मेहर लाडके, ओम अमृतकर, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, आरोही परांजपे, चिन्मय पाटीदार, मशरुफ शेख, अर्ष शेख यांनी सहकार्य केले.

अंतिम निकाल असा

१७ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल स्कोअर :- (२-१)

१७ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल स्कोअर : – (२-१)

१९ वर्षांखालील मुले – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय स्कोअर :- (२-०)

१९ वर्षांखालील मुली – अनुभूती स्कूल वि. वि. जी एच रायसोनी पब्लिक स्कूल स्कोअर :- (२-०)


Next Post
किशोर सोनवणे खून प्रकरणातील दोघांना ठोकल्या बेड्या

किशोर सोनवणे खून प्रकरणातील दोघांना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

भर रस्त्यावर प्रसूती प्रकरण: सीईओंच्या कडक भूमिकेने आरोग्य यंत्रणेला नवी दिशा
जळगाव जिल्हा

भर रस्त्यावर प्रसूती प्रकरण: सीईओंच्या कडक भूमिकेने आरोग्य यंत्रणेला नवी दिशा

May 31, 2025
जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान
आरोग्य

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

May 31, 2025
अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत
खान्देश

अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत

May 31, 2025
दुर्दैवी! अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून १५ वर्षीय बालिकेचा मृत्यू
जळगाव जिल्हा

दुर्दैवी! अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून १५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

May 30, 2025
पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न फसला ; चार दरोडेखोर मुद्देमालासह जेरबंद
गुन्हे

पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न फसला ; चार दरोडेखोर मुद्देमालासह जेरबंद

May 30, 2025
चोरीच्या दोन सायकलींसह चोरटा जेरबंद: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
गुन्हे

चोरीच्या दोन सायकलींसह चोरटा जेरबंद: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

May 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group