जळगाव, दि.17 – भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आलेय. दिनांक 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार्या 11 व्या संसदेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले असून, यात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी जळगावात गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर पंकज नन्नवरे, रायसोनी इन्स्टिट्यूट च्या संचालिका डॉक्टर प्रीती अग्रवाल उपस्थित होत्या. दरम्यान भारतीय छात्र संसदेचे विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.
पहा.. व्हिडिओ