• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी ! – डॉ.अनिल काकोडकर

चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजला मिळाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 20, 2024
in शैक्षणिक
0
‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी ! – डॉ.अनिल काकोडकर

जळगाव | दि.२० जुलै २०२४ | भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून भारताचे भवितव्य घडविण्याचे मूल्यवर्धित काम आणखी खूप मोठ्या स्वरूपात करायचे आहे. स्वच्छता अभियान, वाहतूक नियमांचे पालन, सूत्रबद्धतेसह काटेकोर व्यवस्थापनाद्वारे कल्पनाशक्तीतून नवीन पिढी हे शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे, त्याची रूजवात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेतून झाली आहे खरं तर ही प्रतियोगिता शाळा शाळा राबवून त्याची चळवळ व्हावी, असे अध्यक्षीय भाषणात अणूशास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रतिपादन केले.

गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता-२०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.अनिक काकोडकर यांच्यासमवेत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी संस्कार विचार परिक्षेचे समन्वयक गिरीष कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. दरम्यान भाविका महाजन, नारायणी वाणी आणि खिलेश कोल्हे या विद्यार्थ्यांना पाहुण्यांसमवेत उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर येण्याचा सन्मान मिळाला. संत कबीरजींच्या ‘चदरीया झिनी रे झिनी…’चे गाणे सर्वांचे लक्ष वेधून गेले. प्रास्ताविक व निवेदन गिरीष कुळकर्णी यांनी केले.

अशोक जैन म्हणाले की,‘राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरणाचा समतोल राखणे, शेतीविषयी आवड निर्माण करणे हे विषय शिकविले गेले पाहिजे, भौतिक विज्ञानयुगात आपण भविष्यासाठी काय वाढून ठेवतो आहे याचं चिंतन केले पाहिजे, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचा स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा खूप मोलाचा उपक्रम आहे. ‘जेव्हा आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्वच्छता असते तेव्हा ती देवत्वाकडे जाते’ या महात्मा गांधीजींच्या विचारातून गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करत आहे. अहिंसेला मध्यबिंदू ठेवून सामाजिक जागृतीचे माध्यम ठरत आहे. महात्मा गांधीजींच्या शिकवणीनुसार खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी ग्रामीण भागात शेती आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण फ्यूचर अॅग्रीकल्चर लिडर ऑफ इंडिया अर्थात फाली उपक्रमात सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.’

पुरस्कार प्राप्त शाळा..
महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे स्वरुप) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांना देऊन गौरविले गेले.

ग्रामीण भागातील विजेते..
आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, पेठवडगाव (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरुण, ता. जि. जळगाव. (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), सोमय्या विद्यामंदिर व उच्च माध्य विद्यालय, साकरवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

तालुका स्तरीय विजेते..
साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज,(प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), पां. बा. मा. म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव, ता. जि. जळगाव, (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

जिल्हास्तरीय विजेते..
एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह),भारतीय जैन संघटना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), दयानंद आर्य कन्या विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, नागपूर, ता. जि. नागपूर आणि मातोश्री अकादमी द एक्सपेरीमेंटल स्कूल, तुकुम, चंद्रपूर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह) पारितोषिके वितरण अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अशोक जैन आणि डॉ. सुदर्शन आयंगार यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शन चंद्रशेखर पाटील यांनी केले.

विशेष पुरस्काराने सन्मान झालेल्या शाळा..
मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, के ई एस कन्या शाळा, पांढरकवडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार जनता हायस्कुल, साकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव श्री रामेश्वर विद्यालय, वारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग वाय. एम. खान उर्दू हायस्कुल, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, संभाजीनगर, ता. जि. संभाजीनगर. राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुल्हे-पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव. वल्लभ विद्या मंदिर, पाडळदा, ता. शहादा, जि. नंदुरबार, आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, नरके’ज पन्हाळा पब्लिक स्कुल व ज्यू. कॉलेज, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, प. न. लुंकड कन्या शाळा, जळगाव, ता. जि. जळगाव. जीवन विकास विद्यालय, देवग्राम, ता. नरखेड, जि.- नागपुर न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव. कृषक विद्यालय, कोटगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, शिवाजी विद्यालय, अंचरवाडी, ता. चिखली, जि. बुलडाणा. चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी, ता. जि. सातारा नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनियर कॉलेज, जळगाव, ता. जि. जळगाव. श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, ता. जि. लातूर. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला कै. पी. के. शिंदे माध्यमिक विदयालय, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव. श्री तुळजा भवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर, ता. जि. धाराशिव पी. आर. हायस्कूल, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव मातोश्री उच्च प्राथमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव, रॉयल पब्लिक स्कुल, भंडारा, ता. जि. भंडारा या शाळां पैकी प्रातिनिधीक २० शाळांचा विशेष सन्मानचिन्हाने सन्मान केला गेला.

 


 

Next Post
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संदेश ; नदीकाठच्या गावाने सतर्क रहा..

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संदेश ; नदीकाठच्या गावाने सतर्क रहा..

ताज्या बातम्या

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group