जळगाव | दि.२५ जुन २०२४ | देशाच्या एकतेसाठी झटणारे नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी जळगाव लोकसभा निवडणूक समीक्षा बैठक ब्राह्मण सभा जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सर्वप्रथम स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित, प्रदेश सचिव अजय भोळे, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, भार्गवी पाटील, विजया गवळी, देवयानी ठाकरे, रवी पाटील, हिरालाल पाटील, एड. सी.आर.पाटील, (अमळनेर) कैलास पाटील, मुकुंदा चौधरी, धीरज महाजन, राहुल वाघ, राजू मराठे, माजी सैनिक डी.एम.बडगुजर, भैरवी वाघ- पलांडे आदींची उपस्थिती होती.