• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 18, 2024
in शैक्षणिक
0
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा

जळगाव | दि.१८ जुन २०२४ | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव महोदय, आयुक्त, अप्पर आयुक्त यांच्या निर्देशानुसार शाळा प्रवेशोत्सव पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने शाळा प्रवेशोत्सवानिमित्त शाळांवर प्रभात फेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे औक्षण तथा पुष्पगुच्छ देऊन स्वागत, शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप, गणवेष तथा शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवानिमित्त प्रत्येक शाळेवर पालक मेळावा घेण्यात आला व त्यामध्ये शैक्षणिक वर्षात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा तथा उपक्रमांचा आढावा तसेच माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी, गावातील लोक प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सदस्य आदी उपस्थित होते. प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, पालक वर्ग व सर्व विद्यार्थी यांचेसाठी मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी नवीन शैक्षणिक वर्षात गुणवत्तेवर भर देण्यात येणार असल्याचे सांगुन आगामी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. या प्रवेशोत्सवासाठी प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील व शराजेंद्र लवणे यांनी मार्गदर्शन केले. यावल प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी , शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Next Post
बचतगटाच्या शेकडो महिलांची ‘डीआरडीए’च्या कार्यालयात धडक !

बचतगटाच्या शेकडो महिलांची 'डीआरडीए'च्या कार्यालयात धडक !

ताज्या बातम्या

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य
कृषी

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 20, 2026
जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

April 19, 2026
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!
जळगाव जिल्हा

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

April 19, 2026
रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत
गुन्हे

रिक्षा चोरणारा चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७५ हजारांची रिक्षा हस्तगत

April 18, 2026
सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group