• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रावेरात आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ

मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे मतदारांचे आश्वासन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 6, 2024
in राजकीय
0
रावेरात आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ

रावेर, दि. ०६ – महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा रविवारी रावेर शहरात आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. रावेरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरात प्रचार नारळ वाढविण्यात आला.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शिवसेना (उबाठा गट) उपप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष शितल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, विनायक महाजन, एस आर चौधरी, अशोक शिंदे, सुरेश चिंधू पाटील, अब्दुल मुतालिब, संजय वाणी, सोपान बाबुराव पाटील, सादिक मेंबर, आयुब मेंबर, यशवंत धनके, ऍड टी डी पाटील, ऍड आर आर पाटील, योगेश बारी, ज्ञानेश्वर महाजन, प्रा डी एस चौधरी, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील,सउद शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी रावेर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे मतदारांनी यावेळी आश्वासन दिले.

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

ताज्या बातम्या

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group