जळगाव, दि.०५ – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांचा दि.५ रोजी मंगळवारी जळगावात युवा संमेलना निमित्त ते तरुणांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी भाजपकडून सोमवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
भाजपा कार्यालय पासून ते सागर पार्क बॅरिस्टर निकम चौक पर्यंत ही दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे (राजुमामा), चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, डाॅ. केतकी पाटील, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, माजी महापौर सीमा भोळे, माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख, महेश जोशी, नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, सरचिटणीस मयूर कापसे, जितेंद्र चौथे, सागर जाधव, गजानन वंजारी व पदाधिकारी तसेच मंडळ अध्यक्ष आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.