जळगाव, दि.१४ – शहरातील एमआयडीसी परिसरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे. ललित उमाकांत दीक्षित (वय २४, ईश्वर कॉलनी, जळगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत ८ गुन्हे दाखल असून ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत प्रस्ताव हा एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. १२ डिसेंबर रोजी, स्थानबध्दचा आदेश पारीत केला.
एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि. दत्तात्रय पोटे, स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी स्थानबध्द इसमास ताब्यात घेवून मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोकों ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.