योगेश साबळे | विरार, दि.१० – देशातील सर्वात मोठी म्हटली जाणारी मॅरेथॉन स्पर्धा रविवारी विरार येथे संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील व विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी रस्त्यावर पोलीस विभागाने चोक बंदोबस्त ठेवला होता.
यात १ किलोमीटर, ४ किलोमीटर आणि १० किलोमीटर असा स्पर्धेचा रनिंग रूट होता. वसई मधील चिमाजी आप्पा मैदान ते विरारच्या न्यू युवा कॉलेज, फिनिक्स पॉईंट पर्यंत असे दहा किलोमीटरच्या अंतरात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेचे प्रमुख महापौर राजीव पाटील यांनी सर्व स्पर्धकांचे आभार मानून विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
दरम्यान विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करूनआपली कला सादर करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील, आमदार क्षितीज ठाकूर, आजी-माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी व तसेच मराठी चित्रपटातील हिंदी चित्रपटातील कलावंत स्पर्धेत सहभागी झाले होते.