• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

अन्यथा ५० हजार रूपये दंडाची केली जाणार कार्यवाही

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 18, 2023
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जळगाव, दि.१८ – कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी २० ऑक्टोंबर २०२३ पर्यंत गुगल लिंकद्वारे अहवाल सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ कायदा २०१३ (प्रतिबंध, मनाई व निवारण) हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. तसेच सदर कायद्यानुसार प्रत्येक प्रत्येक शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी आस्थापना, शाळा, महाविदयालय, महामंडळ, कंपनी, कोचिंग क्लासेस यांच्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी आस्थापनेवर असल्यास आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेबाबत कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. तसेच जी कार्यालये / आस्थापना यांचेकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्यात आली नसेल अशी कार्यालये / आस्थापना प्रमुखांवर रक्कम रु.५०,०००/- दंड वसुलीची कार्यवाही करणेबाबत संदर्भिय कायद्याचे कलम २६ (१) यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे.

सदर कायदयांन्वये समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल दरवर्षी शासनास सादर करावा लागतो. परंतू बऱ्याच कार्यालयानमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित केलेल्या नाहीत. त्यानुषंगाने जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून https://forms.gle/XtQb3eoFmRA3ENny5 गुगल लिंक तयार करण्यात आलेली असून या गुगल लिंकवर कार्यालयाने २० ऑक्टोंबर पर्यंत माहिती भरावी असे कळविण्यात आले आहे.

ज्या कार्यालय प्रमुखांकडून अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसेल त्यांना रक्कम रु.५०,०००/- कायद्याचे कलम २६ (१) नुसार दंड आकारण्याच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. तसेच ज्या आस्थापना प्रमुखांच्या अधिनस्त कार्यालयांनी गुगल लिंक भलेलेली नसेल त्या आस्थापना प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून खुलासा सादर करावा लागेल. ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरिल कर्मचारी यांची संख्या १० पेक्षा कमी असेल त्यांनीही गुगुल लिंक भरावी. व १० पेक्षा कमी कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र गुगल फॉमच्या शेवटच्या मुददयामध्ये अपलोड करण्यात यावेत, ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर कर्मचारी यांची संख्या १० किंवा १० पेक्षा अधिक असेल त्यांनी समिती गठीत केल्याच्या आदेशाची प्रत सदरच्या मसुदयामध्ये अपलोड करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकारी आयुश प्रसाद यांनी दिल्या आहेत.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परिषद स्थापन

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group