• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 9, 2023
in कृषी
0
कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक.. -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.०९ – जागतिक कापूस दिना निमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते.

कापूस हे आपल्या राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे, ४२ लाख क्षेत्रावर कापसाचे पिक घेतले जाते, उत्पादकता खुप कमी हेक्टरी ३३६ किलो रूई आहे. त्याचप्रमाणे राज्यात सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असुन उत्पादकता कमी आहे. त्यामुळे कापुस पिकाची उत्पादकता वाढविण्याची खुप आवश्यकता आहे, उत्पादकता आणि बाजारपेठ विचार करावा. जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि उत्पादकता वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली व जैन ठिबक वरील कापूस पिकास भेट दिली.

पिकामध्ये गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरीता वापरण्यात करण्यात आलेल्या जपानी पीबी नॉट तंत्रज्ञान बाबत जैन इरीगेशन चे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी डी जडे ह्यांनी माहीती दिली, ह्या तंत्रज्ञानाचे निष्कर्ष खुप चांगले आहे व शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. कृषी संशोधन केंद्र ममुराबाद चे कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी ह्यांनी जागतिक कापूस दिनाचे महत्व, त्याचा उद्देश ह्यावर माहीती दिली, कापूसतज्ञ डॉ.संजीव पाटील ह्यांनी कापसाचे वाण निवडीचे निकष, लागवड अंतर, झाडांची संख्या तसेच कापूस पिकातील व्यवस्थापना बाबत मनोगत व्यक्त केले.

डॉ.बी डी जडे ह्यांनी कॉटन मिशन २.० मध्ये कापूस पिकाचे उत्पादन कसे मिळवावे तसेच कापूस लागवड गादी वाफा, मल्चिंग फिल्म, ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला. उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा रमेश जाधव ह्यांनी कृषी विभागाच्या योजना विषद केल्या. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाड चे प्रगतीशील शेतकरी संजय दशरथ पाटील होते त्यांनी कापूस शेतीतील अनुभव सांगीतले.

कार्यक्रमा करीता जैन इरीगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, विक्री अभियंता मनोज पाटील, जैन ठिबक वितरक दिनेश पाटील, अजय पाटील, सुशांत चतुर, पी के पाटील, देवेंद्र पाटील आणि परीसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिर्थराज इंगळे यांनी केले.


 

Next Post
‘विद्याधर गीतरंग’ मध्ये जळगावकर रसिक चिंब

'विद्याधर गीतरंग' मध्ये जळगावकर रसिक चिंब

ताज्या बातम्या

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!
खान्देश

एरंडोल | विकासाच्या मुद्द्यावर आमदार अमोल पाटील यांची शहरात भव्य प्रचार रॅली!

November 30, 2025
ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक
गुन्हे

ब्लँकेट खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५३ हजारात फसवणूक

November 30, 2025
खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम
खान्देश

खाऱ्यापाडा शाळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन’ जनजागृती कार्यक्रम

November 29, 2025
पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा
खान्देश

पाल पर्यटन विकासाला गती; सातपुडा जंगल सफारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा

November 29, 2025
संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत
खान्देश

संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

November 29, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वाचन उपक्रम’द्वारे महात्मा फुलेंना आदरांजली; विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन कौशल्ये विकसित

November 28, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group