• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

गुजरातला होईल राष्ट्रीय महिलांची बुद्धिबळ स्पर्धा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 20, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

जळगाव, दि.२० – क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनतर्फे फिडे नामांकित महिलांची राज्यस्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेत जळगाव येथील कु. सानिया रफिक तडवी हिन ८ पैकी ७ गुण (६ विजय २ ड्रॉ) मिळवून स्पर्धेत अपराजित राहत प्रथम क्रमांक मिळविला.

सानिया हिला चषक व १५ हजार रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून मदर अली, प्रशांत विघ्नेश्वर, संग्राम शिंदे, आश्विन मुसळे, मुख्य ऑर्बिटर सप्नील बनसोड, ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे, कुमार कनकम, नरेंद्र कन्नाके उपस्थित होते.

या कामगिरीमुळे गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सानिया तडवी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तिने स्पर्धेत कोल्हापूर ची दिव्या पाटील, आदिती कायल पुणे, ह्यांना हरवून श्रुती काळे औरंगाबाद, तसेच दिशा पाटील कोल्हापूर ह्याच्याशी बरोबरीत डाव साधत महाराष्ट्रात यश मिळवून विजय मिळवला.

१६ ते १८ जून दरम्यान तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्रातूून ४४ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा ८ राऊंड मध्ये घेण्यात आली. सानिया ही महिला बाल कल्याण विभागाचे उपजिल्हाधिकारी रफिक तडवी यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतूक केले आहे.

Next Post
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात आ.भोळेंची हजेरी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात आ.भोळेंची हजेरी

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add