• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..! शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 8, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..! शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

जळगाव, दि.०८ – इंजिनिअरींग झाल्यानंतर वडीलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी.. यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअरींग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकर पासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत.

भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा ता. रावेर), प्रविण पाटील (महेलखेडी, ता. मुक्ताईनगर), गणेश तराळ, (अंतुर्ली ता. मुक्ताईनगर), अतुल उल्हास चौधरी (सांगवी, ता. यावल), प्रमोद बोरोले (साक्रीफेकरी ता. भुसावळ) या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

सहभागी शेतकऱ्यांनी आपआपले अनुभव कथन केले. यात ‘फार्मसीचे शिक्षण होऊन औषधालय सुरू केले. यातून जनसंपर्क वाढला. आपल्या शिक्षणाचा, जनसंपर्काचा विधायक कार्यासाठी उपयोग व्हावा याच उद्देशाने स्वत: बरोबर इतरही पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारा प्रवास शिरपूर तालुक्यातील प्रगतशील युवाशेतकरी पद्माकर पाटील यांनी फालीच्या विद्यार्थ्यांसमोर आपला कृषिविकासाचा पट मांडला. फाली विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात आपल्या कृषिज्ञानात भर पडेल अशा बाबी जाणून घेतल्या. यावेळी प्रायोजकत्व स्वीकारलेल्या कंपनी प्रतिनिधींदेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फालीच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन केंद्रावरील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी बघितले. यात फ्युचर फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक, जैन स्विट ऑरेंज, अति सघन पद्धतीने लागवड केलला आंबा, पेरू व अन्य फळबागांची भेट  दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी शेतावर जाऊन माहिती घेतली.


कृषि बिझनेस मॉडेल व इन्होव्हेशनचे प्रदर्शन..
गत १ जून पासून तिन टप्प्यात पार पडत असलेल्या फालीच्या नवव्या संमेलनास महाराष्ट्र, गुजरात मधील ग्रामीण क्षेत्रातील १०८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील गुरूवारी दि. ८ जून ला तिसऱ्या टप्प्याचा समारोप होईल. यामध्ये ३१ बिझनेस व इन्होव्हेशन विद्यार्थी सादर करणार आहेत.


 

Next Post
फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा - अतुल जैन

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 23, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add